लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ नगर : -जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत नगरमध्ये विद्यमान संचालक शिवाजी कर्डीले यांनी ९४ मते घेऊन एकतर्फी विजय मिळाला तर पारनेर मधून उदय गुलाबराब शेळके यांनी १०५ पैकी मते ९९ घेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा धुव्वा उडविला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या कर्जतमध्ये अंबादास पिसाळ १ मतांनी विजयी झाले आहेत. व पारनेरचे प्रशांत गायकवाड यांनी दतात्रय पानसरे यांचा पराभव करून विजय मिळविला आहे .
शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा विजयी :- जिल्हा बँकेच्या संचालकांच्या मंडळाच्या निवडणुकीसाठी नगर तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक शिवाजीराव कर्डिले हे पुन्हा विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी उमेदवार सत्यभामा बेरड यांचा ९४ मतांनी पराभव केला. या विजयाने कर्डिले आपल्या सर्व विरोधकांना गुलाल आमचाच असल्याचे दाखवून दिले आहे. एकीकडे १७ संचालक बिनविरोध झाले असतांना सहमतीचे पहिले शिलेदार कर्डिले यांनाच यावेळी विरोधकांनी अगदी ठरवून टारगेट केले होते . परंतु एकतर्फी विजय मिळवित विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे .
सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके विजयी :- जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून उदय शेळके विजयी झालेले आहेत. जिल्हा बँकेच्या पारनेर सेवा सोसायटी मतदार संघात उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढत झाली. या लढतीत भोसले यांना सहा मते तर शेळके यांना 99 मते पडली. शेळके विजयीझाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी करताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करण्यात
अंबादास पिसाळ एक मताने विजयी :- कर्जत सोसायटी मतदार संघाची लढत अत्यंत चुरशीची झाली . शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही गटाच्या नेत्यानी ताकद पणाला लावली होती . मिनाक्षी साळुंके व अंबादास पिसाळ यांच्यात ही लढत झाली. कर्जत सोसायटी मतदार संघाच्या 74 मतदारांपैकी 73 जणांनी मतदान केले होते. मतमोजणी मध्ये अंबादास पिसाळ अवघ्या एक मताने विजयी झाले आहेत. यामध्ये साळुंके यांना 36 तर पिसाळ यांना 37 मते मिळाली. येथे विखे फॅक्टर चा करिष्मा सरस ठरला .पिसाळ विजयी झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली.
सभापती प्रशांत गायकवाड विजयी :- जिल्हा बँकेच्या बिगर शेती मतदारसंघातून गायकवाड यांना 763 तर विरोधी पानसरे यांना 574 मते मिळाली यात जिल्हा बँकेचे संचालक व श्रीगोंद्यातील दत्तात्रय पानसरे यांचा दारुण पराभव झाला आहे, पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी तब्बल 189 मतांनी पानसरे यांचा पराभव केला आहे.
सुरुवातीला सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचा मार्ग अवघड झाल्यावर पानसरे यांनी दुसऱ्या मतदारसंघात अर्ज दाखल करून कुठल्याही प्रकारे जिल्हा बँकेत जाण्याचा चंग बांधला होता परंतु यामध्येही त्यांना अपयश आले आहे . वास्तविक पानसरे यांनी गत ५ वर्षाच्या कार्यकाळात धडाकेबाज कामगिरी केली आहे . परंतु त्यासाठी सोसायटी मतदार संघच योग्य होता परंतु तिथे मा आ राहूल जगताप यांच्या पुढे त्यांना माघार घ्यावी लागली व नाईलाजाने बिगर शेती मधून रिंगणात उतरावे लागले .पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी आपल्या संपर्काचा फायदा घेत सर्व नेत्यांची व गटाची सांगड घालत निवडणूक एक हाती जिंकल्याचे दिसून आले आहे
0 टिप्पण्या