लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर :-सतत होणाऱ्या
घरगुती वादातून भावाच्या मदतीने पतीचा खून करणाऱ्या महिलेने पोलिसांची दिशाभूल
करण्याचा प्रयत्न केला. भांडणावेळी पाय घसरून पडल्याने पतीचा मृत्यू झाल्याचे तिने
पोलिसांना सांगितले. मात्र, मृताला झालेली जखम आणि एकूण परिस्थिती पाहून पोलिसांना संशय आला. शेवटी
सत्य बाहेर आले आणि पोलिसांनी तिला आणि तिच्या भावाला अटक केली.
नगर तालुक्यातील वाळूंज शिवरात ही घटना घडली.
तेथे संतोष दत्तात्रय मोरे (वय ४२) याचा खून झाला. नगर तालुका पोलिसांनी संतोष
याची पत्नी प्रियंका आणि तिचा भाऊ रामेश्वर विठ्ठल दशवंत (रा. ताहाराबाद, ता. राहुरी) यांना अटक केली
आहे.
या घटनेची माहिती अशी, संतोष आणि प्रियंका यांच्यात
भांडणे होत होती. अनेकदा तिचा भाऊ रामेश्वर येऊन मध्यस्थी करीत असे. रविवारीही
त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी प्रियंकाने भावाला फोन करून बोलावून घेतले. त्या
दिवशी रात्री त्यांचे पुन्हा भांडण झाले. संतोष ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता.
त्यामुळे रामेश्वर यालाही राग आला. त्याने जवळची कुऱ्हाड उचलून संतोषवर वार केले.
त्यामध्ये संतोषचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या रामेश्वरने तेथून पोबारा केला
आणि थेट आपल्या गावाला निघून गेला.
0 टिप्पण्या