"सर्वस्पर्शी .. सर्वहितैषी .." असा अर्थसंकल्प .. !
लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर : - केंद्रीय अर्थमंत्री निमला सितारामन यांच्या टीमने आज संसदेत जो अर्थसंकल्प सादर केला आहे , त्याचे खऱ्या अर्थाने व एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास सर्वस्पर्शी .. सर्वहितैषी .." असेच करावे लागेल , कारण या अर्थसंल्पात शेवटच्या घटकापासून सर्वोच्च स्थानापर्यंतच्या घटकाला न्याय दिला गेला आहे , अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रा . भानुदास बेरड यांनी दिली .
पुढे त्यांनी म्हटले आहे की ,मा. नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत बनवण्यासाठी व कोरोना महामारीतून अर्थव्यवस्था सावरणार असा, तसेच सर्व स्तरातील नागरिक, गरिबातील गरीब माणसाचा विचार असणारा, उद्योग, बँका, रस्ते, रेल्वे, शेती, पर्यावरण, आरोग्य यावर भर असणारा हा दुरदृष्टीने तयार केलेला अर्थसंकल्प आहे. अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन व अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
0 टिप्पण्या