Ticker

6/Breaking/ticker-posts

कांद्याच्या पडत्या भावाने शेतकऱ्यांचे वांधे ..!

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर : -  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने काही दिवसांपूर्वी वधारलेल्या कांद्याच्या दरात प्रचंड घसरण  झाली असल्याच चित्र आहे .

कांदा 20 ते 24 रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा तेवढ्याच वेगाने घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

मागील एक महिन्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची कमी अधिक स्वरूपात आवक असल्याने कांद्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता व दर 30 ते 40 रुपयांपर्यंत स्थिरावलेले असायचे. 

मागील काही दिवसांपासून कांद्याला मिळत असलेले उच्चांकी दर पाहता पुढे हे दर असेच टिकुन राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आजच्या लिलावात कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने आता चांगले दर मिळण्याच्या आशेवर मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केलेल्या अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

शनिवारी 32 हजार 522 क्विंटल कांद्याची आवक बाजारात झाली.परिणामी कांद्याच्या दरात घसरण झाली असून आता एक नंबरचा कांदा 20 ते 25 रूपये, दोन नंबरचा कांदा 15 ते 20 रूपये, तिन नंबरचा कांदा 900 ते 1500 रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या