( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर:- महावितरणच्या नगर शहर व ग्रामीण विभाग
अंतर्गत असलेल्या तेलीखुंट कार्यालयाचे सहाय्यक अभियंता व जनमित्र यांना 5 फेब्रुवारी
2021 रोजी रात्री कार्यालयात झालेली मारहाण ही निंदनीय असूनया घटनेमुळे
अभियंते व कर्मचार्यांनी खचून जाऊ नये, आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे
यांनी आज दिले.
नगर शहर उपविभाग क्र.2 अंतर्गत असणार्या तेलिखुंट या शाखा कक्षातील रात्रपाळी
ड्युटीवर असणारे कर्मचारी प्रकाश शेळके, बापूसाहेब बडेकर आणि सहाय्यक अभियंता राजेंद्र
पालवे यांना निखिल धंगेकर या व्यक्तीने शुक्रवारी रात्री कार्यालयात घुसून मारहाण केली
होती. आरोपीविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी
तत्परतेने आरोपीस अटक केली आहे. या दुर्दैवी घटनेची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त
तनपुरे यांनी आज तेलिखुंट कक्ष येथे प्रत्यक्ष भेट दिली व सर्व कर्मचार्यांची प्रत्यक्ष
भेट घेतली.
त्याच्यां कडून झालेल्या प्रकाराची संपूर्ण चौकशी करीत या घटनेची माहिती घेतली.
तसेच पोलिस प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. पोलीस प्रशासनाने
गुन्हा दाखल केलेला असून आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पुढिल कारवाईसाठी कायद्याची
पुर्णपणे मदत घेत पुढिल कारवाई करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या