लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
आशिया खंडात अग्रेसर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेवर जल संधारण मंत्री शंकर राव गडाख यांची बिनविरोध निवड झाली आहे . ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी अनेक वर्षे जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व केले आहे . तसेच अध्यक्षपदही भूषवलं आहे . कै. भाऊ साहेब थोरात , बाबूराव दादा तनपुरे , मारुतराव घुले पाटील यांच्या विचारावर आदर्शावर बँकेचा कारभार केला . आता ना . गडाख यांना वडलांच्या विचाराचा वारसा बँकेत पुढे चालवावा लागणार आहे . किंबहुना ते त्यांच्या विचारावर काम करतील अशी अपेक्षा आहे . त्यांच्या निवडी नंतर कार्यकत्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला आहे .
0 टिप्पण्या