लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई:-राज्यात खरेच करोना वाढल्याची परिस्थिती आहे, की औषधनिर्मिती कंपन्यांसाठी काही विशेष बाब आहे, असा सवाल उपस्थित करीत मनसे नेते बाळा
नांदगावकर यांनी मंगळवारी राज्य सरकारच्या भूमिकेवर
संशय व्यक्त केला. एकीकडे नाना पटोले भव्यदिव्य
ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी करोना पसरत नाही का? त्यामुळे सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर नाही ना, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना नांदगावकर म्हणाले की , करोना काळात राज्यात औषध निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली आहे, ही औषधे सध्या
विकली जात नाहीत अशी परिस्थिती आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर अचानक
मुंबईसह महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर
निर्बंध लादले आहेत. ही बाब महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि भाई जगताप
यांना देखील सांगा, अशी माझी विनंती आहे. एकीकडे
नाना पटोले भव्यदिव्य ट्रॅक्टर रॅली काढतात, तर दुसरीकडे
भाई जगताप लाँग मार्च काढतात. यावेळी करोना पसरत नाही का', असा सवाल त्यांनी केला.
सध्या जे काही निर्बंध लादण्यात आले आहेत, यामागे औषध कंपन्यांसाठी काही विशेष बाब तर
नाही ना? कारण करोना काळात मोठ्या प्रमाणात औषधे निर्माण
करण्यात आली आहेत. परंतु या औषधांच्या साइड्स इफेक्ट्समुळे ही औषधे खरेदी
करण्यासाठी नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या हिताचा तर यामागे
विचार नाही ना, अशा शब्दांत नांदगावकर यांनी ठाकरे
सरकारच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या