Ticker

6/Breaking/ticker-posts

छत्रपतींचा आदर्श हा समाजाला दिशादर्शक : माजी खा. दिलीप गांधी

 





लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अ .नगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे माजी खा. दिलीप गांधी यांनी एसटी स्टँड येथील अश्वरुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले

. यावेळी माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, शरद ठुबे, अभिषेक दायमा, बाळासाहेब पोटघन, दादासाहेब मोटे, मल्हारी दराडे, नाना जेवरे आदी उपस्थित होते. 

माजी खा. गांधी म्हणाले की, छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजप्रबोधन करावे. जात-धर्म व पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन समता व बंधुत्व प्रस्थापित केली. रयतेला केंद्रबिंदू मानून त्यांनी आपला राज्यकारभार केला. छत्रपतींची कामे समाजाला प्रेरणा देणारे आहेत. त्याचा उजाळा आपण सर्वांनी देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या