लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर- भिंगार येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जावेद रौफ शेख ( वय 42, घर नं. 176 मोमीन गल्ली भिंगार) याला ठाणे येथे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जावेद शेख याने मयत रमेश उर्फ खबरचंद काळे याला मेलेली बकरी देतो, असे सांगून भिंगार येथे मोमीनगल्लीच्या जवळ असलेल्या काठवणामध्ये मयत काळे याला नेऊन आमच्या बकऱ्या चोरतोच, असे म्हणून जावेद शेख व त्याच्या सोबत असलेल्या तीन अनोळखी साथीदारांनी काळे याला मारहाण करून आरोपी जावेद शेख याने मयत काळे याला सोबत आणलेल्या बाटलीमधील काहीतरी विषारी औषध पाजले होते. यानंतर रमेश उर्फ रमाकांत काळे हा सिटीकेअर रुग्णालयात उपचारासाठी घेत असताना दुसऱ्या दिवशी तो मयत झाला होता.
सदर घटनेमध्ये तपासाअंती भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात 302, 328, 323, 34 कलमान्वये जावेद शेख व त्याच्या साथीदारांविरोधात पोसई भैय्यासाहेब देशमुख यांनी दि.20/12/2020 ला गुन्हा दाखल केला होता. या दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी जावेद शेख हा फरार होता. या दाखल गुन्ह्यातील आरोपी शेख हा मुंबई येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना मिळाली होती. या महत्त्वपूर्ण माहितीनुसार श्री कटके यांनी आरोपी शेख याला शोधण्यासाठी स्वतंत्र पथके मुंबईला पाठवले होते. या तपास दरम्यान आरोपी जावेद शेख हा राबोडी परिसर ठाणे येथे नात्याकडे राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून आरोपी जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात दिले. या गंभीर प्रकरणाचा पुढील अधिक तपासास नगर शहर उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे हे करीत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल खटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोहेकाॅ भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, पोना ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकाॅ संदीप दरंदले, योगेश सातपुते, चापोहेकाँ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
0 टिप्पण्या