पाथर्डी तालुक्यातील करंजीत एकाचा व शेवगाव तालुक्यातील वरुरला एकाचा दुदैवी
मृत्यू
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
करंजी/ वरुर :- कोरोनाने शहरी भागात
पुन्हा एकदा मोठ्या वेगाने डोकेवर काढले असून हाच कोरोना आता ग्रामीण भागात देखील
हातपाय पसरू लागला आहे. करंजी गावात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून
यामध्ये एका व्यक्तीचा शनिवारी मृत्यू देखील झाला आहे. तर शेवगाव तालुक्यातील वरुरला
काल एकाचा कोरोनामुळे दुदैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान गावातील ग्रामसेवक नॉटरिचेबल असुन आरोग्य
यंत्रणा सुधा गाफील होती. या घट्नेमुळे एकच घबराट पसरली आहे.
त्यामुळे करंजीसह परिसरातील सर्वच नागरिकांनी
स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे. गेल्या
काही दिवसापासून शहरी भागात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून त्यामुळे प्रशासन
देखील सतर्क झाले आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना मास्क वापरण्याचे सोशल डिस्टन
ठेवण्याचे व वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करू लागले आहे. ग्रामीण भागात
कोरोणाचा पादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी स्वतःबरोबरच
आपल्या कुटुंबाची आत्तापासूनच खबरदारी घेवून कोरोणा बाबतचे सर्व नियम तंतोतंत
पाळले तर कोरूनाला निश्चितपणे ग्रामीण भागातील जनतेपासून दूर ठेवणे शक्य होईल.
ग्रामीण भागातील आठवडे बाजार, लग्न
सोहळ्यासह गर्दीच्या ठिकाणी नागरिक अजिबातच मास्क वापरताना आढळून येत नाहीत
त्यामुळे नागरिकांचा हा हलगर्जीपणा त्यांच्यासह
त्यांच्या कुटुंबाच्या देखील जिवाला धोका निर्माण करणारा ठरू शकतो. नागरिकांनी
स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
0 टिप्पण्या