Ticker

6/Breaking/ticker-posts

अमृतवाहिनी इंजिनिअरिंगला "सर्वोत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार" प्रदान

 

( (


(





अहमदनगर:- (ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'* यांच्याकडून गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत देण्यात येणारा ग्रामीण विभागातील "सर्वोत्कृष्ट संलग्न महाविद्यालय पुरस्कार" अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला आज कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयुताई देशमुख, प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.

     अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेने देशभरात महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आ.डाॅ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नावलौकिक मिळवत आहे. हा पुरस्कार यापूर्वी शैक्षणिक वर्ष 2009-10 मध्ये अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला मिळाला होता. सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळणारे पुणे विद्यापीठातील अमृतवाहिनी हे एकमेव सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या