Ticker

6/Breaking/ticker-posts

घोटण : सरपंचपदी सौ.तारा प्रकाश घुगे तर, उपसरपंचपदी सौ.ज्योती अनिल शेळके

 



लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

घोटण : – शेवगाव तालुक्यात राजकीयदृष्टया प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घोटण ग्रामपंचायत पदाधिकारी निवडीत ग्रामपंचायतीची सत्ता अबाधित ठेवण्यास राष्ट्रवादी पुरस्कृत स्थानिक श्री मल्लिकार्जुनेश्वर शेतकरी विकास मंडळास यश मिळाले आहे. उत्कंठावर्धक ठरलेल्या सत्तासंघर्षात सरपंचपदी सौ.तारा प्रकाश घुगे यांची तर, उपसरपंचपदी सौ.ज्योती अनिल शेळके यांची वर्णी लागली.

       घोटण ग्रामपंचायत गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ग्रामपंचायतीचे सरपंचपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित होते. सरपंचपदासाठी शेतकरी विकास मंडळाकडून सौ.तारा घुगे यांनी अर्ज दाखल केला. सदस्या सौ.संगीता घाडगे यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली. तर, विरोधी ग्रामविकास मंडळाकडून सौ.पुष्पाबाई जगन्नाथ पवार यांनी अर्ज दाखल केला. सदस्य ज्ञानेश्वर कुलट यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली. उपसरपंचपदासाठी शेतकरी विकास मंडळाकडून सौ.ज्योती शेळके यांनी अर्ज दाखल केला. सदस्या सौ.पद्मा जगधने यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली. तर, विरोधी ग्रामविकास मंडळाकडून तुकाराम नामदेव थोरवे यांनी अर्ज दाखल केला. सदस्य डेव्हीड गंगावणे यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली.

        सत्ताधारी शेतकरी विकास मंडळाची व्यूहरचना केदारेश्वरचे संचालक रणजीत घुगे, माजी सरपंच अरुण घाडगे, कुंडलिक घुगे, मधुकर विघ्ने, गणेश शेलार यांनी हातात घेतली. तर, विरोधी मंडळाची सूत्रे सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष लक्ष्मण टाकळकर, मदन मोटकर, माजी सरपंच संजय टाकळकर यांच्याकडे होती. विरोधी मंडळातील सदस्यांनी परिस्थितीचा अंदाज घेत मतदान प्रक्रियेत सहभागी होणे टाळले. त्यामुळे सरपंचपदासाठी सौ.तारा घुगे व उपसरपंचपदासाठी सौ. ज्योती शेळके यांची ७ विरुध्द ० अशा निर्विवाद मतांनी निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.वाय.कोंगे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक हरिभाऊ बोडखे व कामगार तलाठी विष्णू खेडकर यांनी त्यांना सहाय्य केले.

        पदाधिकारी निवडीनंतर सत्ताधारी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांनी जल्लोषांत मिरवणूक काढून ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनेश्वराचे दर्शन घेतले. मिरवणुकीत ग्रा.पं.सदस्य सचिन घुगे, विष्णू घुगे, सौ.संगीता घाडगे, सौ.सविता आव्हाड, सौ.पद्माबाई जगधने यांच्यासह सर्जेराव ढाकणे, बाबासाहेब वनवे, नामदेव घुगे, कल्याण विघ्ने, प्रकाश घुगे, अर्जुन घुगे, पोपट दौंड, विठ्ठल घुगे, नितीन आव्हाड, संजय खेडकर, विठ्ठल थोरवे, राजेंद्र क्षीरसागर, पंढरीनाथ जगधने, उत्तम डोईफोडे, राजेंद्र घुगे, मधुकर दौंड, जगदीश जगधने, भास्कर घुगे, शिवाजी खेडकर, शिवाजी घुगे, भाऊसाहेब गर्जे, संतोष घुगे, लहानु जगधने, बाळू क्षीरसागर, अनिल गोसावी, कालिदास घुगे, हरिभाऊ ढाकणे, संदीप फुंदे, संदीप मोटकर, राजेंद्र दौलत घुगे, कांता सोनवणे, बापू शेळके, रावसाहेब शेळके, गणेश खेडकर, सुनील थोरवे, काकासाहेब आव्हाड, रावसाहेब खेडकर, अंकूश शेळके, शाम साळवे, अशोक साळवे, महादेव मोटकर, अशोक घुगे, पोपट साळवे, दिलीप शिंदे, नामदेव खेडकर, विष्णू दौंड, गणपत घनवट, प्रकाश थोरात, बाळासाहेब जगधने, रमेश जगधने, तुळशीराम विघ्ने, नामदेव विघ्ने, नागेश बेळगे, भारत बर्वे, दादासाहेब थोरवे, गहिनीनाथ खेडकर, प्रशांत थोरवे, लक्ष्मण विघ्ने व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या