लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मढी :- येत्या
10 ते 13 तारखे दरम्यान होणारी श्री.क्षेत्र मायंबा देवस्थानची पौष अमवस्याच्या दिवशी
असणारी यात्रा रूढी परंपरा पाळत साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय विश्वस्त,ग्रामस्थ
व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. कुस्त्यांचा हंगामा रद्द
करण्यात आला असुन व्यवसायिकांना व्यवसायासाठी जागा दिली जाणार नाही .असी माहीती देवस्थान
समीतीच्या वतीने देण्यात आली आहे .
श्री.क्षेत्र मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची
यात्रा अमावस्या पासून धर्माचं बीजेपर्यंत अशी तीन दिवस असते.यात्रेसाठी राज्यासह कार्नाटक,गुजरात,आंध्रप्रदेशातून
भाविक मोठ्या संख्येने येतात.कोरोणा साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर भव्य यात्रा न होता
केवळ धार्मिक विधी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांकडून होतील.यात्रेत कोणताही प्रकारचे
वाद्य वाजविले जाणार नाहीत. डि .जे ,डॉलीबाजा , बॅडपथक यांनी येऊ नये .तसेच कोणत्याही
प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत.भाविकांची गर्दी पूर्णपणे टाळण्यासाठी कोणतेही
विधी सामूहिक स्वरूपात करता येणार नाहीत.भंडारा,महाप्रसादाला यात्राकाळात बंदी घालण्यात
आली आहे .
मायंबा यात्रा नंतर राज्यातील इतर यात्रा सुरुवात
नाथ संप्रदायाचे प्रथम मच्छिंद्रनाथ यांची मायंबा येथे संजीवन समाधी असून तेथून जवळ
मढी येथे चैतन्य कानिफनाथाची संजीवन समाधी आहे होळीपासून गुढी पाडव्यापर्यंत पंधरा
दिवस मढीची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होते मायंबा यात्रेला नाच सांप्रदायिक
आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असून यात्रेनिमित्त मोठी आर्थिक उलाढाल होते कोणत्याही
प्रकारच्या व्यवसायिकांनी यात्रेसाठी येऊ नये देवस्थान समितीतर्फे कोणत्याही बाहेरच्या
व्यवसायिकांना व्यवसायासाठी जागा दिली जाणार नाही कुस्त्यांचा हंगामा सुद्धा रद्द करण्यात
आल्याने सर्वच कुस्तीगिरांनी यात्रा बदलाची नोंद घ्यावी यात्रेच्या दिवशी संजीवन समाधी
ची महापूजा अभिषेक नूतन वस आलंकार फुलांची सजावट केली जाईल .मायंबा येथील यात्रा उत्सव
रद्द झाल्याने याचा परिणाम मढी वृद्धेश्वर व मोहटादेवी येथील उलाढालीवर होणार
आहे.
0 टिप्पण्या