सोनईमध्ये शिवराय मित्र मंडळातर्फे खिचडी वाटप
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सोनई : स्वराज्यासाठी मोहिमा यशस्वी करण्याबरोबरच ' राज्य कारभाराची घडी सुद्धा माणसं नेमून बसविली . अष्टप्रधान मंडळाद्वारे सुव्यवस्थित कारभार चालविणारे शिवाजी महाराज एक कुशल प्रशासक होते असे प्रतिपादन सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी केले .
येथील शिवराय तरुण मित्र मंडळाच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक व पुष्पहार अर्पण करून कर्पे यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली ,यावेळी युवकांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते . सोनई पोलिस स्टेशनचे सोमनाथ झांबरे व कर्मचारी उपस्थित होते .
पुढे बोलताना ते म्हणाले की .महाराष्ट्राच्या या मातीला शौर्याचं कोंदण घालून जगभर आदर्श राजा म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जेवढे शूर होते तेवढेच चाणाक्ष अन् मुत्सद्दी सुद्धा होते . प्रजाहितदक्ष राजा म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे . त्यांचा विचार प्रेरणादायी असून तरुणांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले .
शिवराय मित्र मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त सोनईमध्ये खिचडी वाटप करण्यात आली. व यावेळी , मृत्युंजय मोरे, मयुर गडाख, दिनेश आसने, अतुल गडाख, अमोल, गडाख, विशाल वने, पंकज भागवत, अक्षय निमसे, प्रविण कोकाटे, संतोष बढदे, संदिप दरंदले, भारत पांजगे, अनिकेत ठोकळ व विशाल ढोबळे, अभिजित राख, आदि उपस्थित होते. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला.
0 टिप्पण्या