( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जेजुरी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा गोपीचंद पडळकर यांचा
प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करत आहेत. उद्या
रीतसर 13 फेब्रुवारी रोजी रोजी 4.30 वाजता शरद पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण
होणार आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. पुतळ्याचं
उद्घाटन झालं असल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख
यांनी म्हटलं आहे की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा
गोपीचंद पडळकर यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलीस त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही
करत आहेत. उद्या रीतसर 13 फेब्रुवारी रोजी रोजी 4.30 वाजता शरद पवार यांच्या हस्ते
या पुतळ्याचे अनावरण होणार आहे, असं अनिल देशमुख म्हणाले. तर आजवर अनेक वेळा बेकायदेशीर
उद्घाटनं झाली पण कधी गुन्हे दाखल झाले नाहीत. मात्र आमदार पडळकर प्रकरणी लगेच गुन्हा
दाखल केला गेला, असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. आमदार
गोपीचंद पडळकर हे सतत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर टीका करत असतात.
आता पुन्हा गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना चॅलेंज केलं आहे. जेजुरी गडावर
जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुन
आज पहाटे चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे
अनावरण उद्या
खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने
उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि
छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण झाली
आहे. मात्र आज पहाटे अचानक भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह
जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा
प्रयत्न केला. यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचार्यांमधे
झटापट देखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचं गोपीचंद
पडळकर यांनी जाहीर केले आणि ते कार्यकर्त्यांसह निघून गेले.
पुतळ्याचं
अनावरण केल्याचा पडळकरांचा दावा
यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, अखंड
भारताचे दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जेजुरी संस्थानाने उभारला आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठं काम केलं आहे. त्यांचा
पुतळा उभारण्याचं चांगलं काम संस्थाननं केलं आहे. या पुतळ्याचं अनावरण उद्या शरद पवार
यांच्या हस्ते करण्याचं ठरवलं होतं. पण महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक युवामित्रांचं
म्हणणं होतं की शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन
होणं हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखं आहे. आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही. मात्र
भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही या पुतळ्याचं उद्घाटन करु नये, असंही पडळकर
म्हणाले.
ते म्हणाले की, शरद पवारांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याला हात लावताना विचार करावा. कारण
त्यांच्या आणि अहिल्याबाई यांच्या विचारात फार तफावत आहे. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी
पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या पुतळ्याच्या पायावर माल्यार्पण करुन उद्घाटन झालं असं
जाहिर करतो, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या