लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
पाथर्डी
- तिसगाव येथे काल
रात्री झालेल्या चोरीच्या घटनेत चाकू दाखवून चोरट्यानी सुमारे 1 लाखाचा माल लंपास केला आहे. मुख्य रस्त्यावर झालेल्या चोरीच्या घटनेने
नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तिसगाव येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर राहत असलेल्या संदीप दानवे यांच्या राहत्या घरी ही चोरीची घटना रात्री पावणे तीनच्या सुमारास घडली. चोरट्यानी घराची ग्रीलची खिडकी वाकवून आत प्रवेश केला. आवाजाने घरातील लोक जागे होताच चोरट्यांनी धारदार चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोने मिळवून सुमारे लाखाचा माल चोरून नेला असल्याचे संदीप दानवे यांनी सांगितले.
सकाळी श्वानपथकास पाचारण करण्यात
आले होते. पाथर्डी चे पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी भेट देऊन पाहणी केली.
तिसगाव मध्ये सतत घडणाऱ्या घरफोड्या, मोटर सायकल , विजपंप चोरीच्या घटनेने ग्रामस्थ त्रस्त
झाले असून पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत
आहे.
0 टिप्पण्या