Ticker

6/Breaking/ticker-posts

अबब.. २ कोटीचा मांडूळ साप ..! भामटा जेरबंद ..

 













लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )         

पनवेल :  मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य मिळत असल्याचे अमिष  दाखवूून मांडूळ लाखोना विक्री करून नागरिकांची फसवणूक करणार्‍या एकास पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, खारघर परिसरात द क्राऊन बिल्डींगजवळ एकजण मांडूळ साप विक्रीलि घेऊन येणार असल्याची माहिती खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली होती. ती माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली, त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विमल बिडवे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांच्या पथकाने द क्राऊन बिल्डींग से.-15, खारघर येथे मंगळवारी (23 फेब्रुवारी) सापळा लावला. दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास त्या इमारतीतून बाहेर पडणार्‍या गेटजवळून एकजण बॅग घेऊन आत जात होता, या दरम्यान त्याच्या दिशेने पोलीस जात असतानाच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्याला मोठ्या शताफीने ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या आरोपीला मिळणारे पैशांतून हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा त्याची योजना होती, असे पोलीसांना कडून सांगण्यात आले.

त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली. यावेळी बॅगेमध्ये 152 सेमी लांबीचा मांडूळ साप मिळून आला. 5 किलो 240 ग्रॅम वजनाच्या या सापाची किंमत 2 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी साप जप्त करून त्या 40 वर्षीय इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द फसवणूक व तस्करीप्रकरणी भादंवि कलम 420, 511 सह वन्यजीव प्राणी 1972 कलम 51, 52 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. हा इसम मॅकेनिक असून, भिवंडीतील दलोंडे-दिगाशी येथील राहणारा आहे. या गांडूळ सापाच्या मोबदल्यात मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्या पैशांतून हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा त्याचे स्वप्न होते. परंतु त्याचा हे स्वप्न खारघर पोलिसांनी उधळून लावला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेलदार हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या