लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : - शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या जाचक अटी तातडीने शिथिल कराव्यात अन्यथा तसे न केल्यास मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर यंदाची शिवजयंती साजरी करू, असा इशारा मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला आहे .
यासंदर्भात दहातोंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवून त्यात म्हटले आहे की , येत्या दि.१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव जागतिक स्तरावर साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करावी असे बंधन टाकल्यामुळे महाराष्ट्रात शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वास्तविक कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यभर विविध आंदोलन , मोर्चे , मेळावे , लग्न सोहळे धुम -धडाक्यात सुरु आहेत . राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच जोषात पार पडल्या; सगळं सुरळीत सुरु असताना शिवजयंती सोहळ्यावर मात्र बंधन हे कितपत योग्य आहे . त्यामुळे सरकारने घातलेल्या अटी तातडीने शिथिल कराव्यात, अन्यथा महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांसह मराठा महासंघ १९ फेब्रुवारी रोजी थेट मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी शिवजयंती साजरी करील असे म्हटले आहे .
0 टिप्पण्या