Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासारमध्ये शिवजयंती साजरी

 





लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार :पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले कोरोना प्रतीबंध परिस्थिती नुसार इतर खर्चाला फाटा देत साध्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली .

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पुर्व तयारी पंधरवाडया पासुन सुरू होती छत्रपती स्मारकाचे रंगरंगोटी काम श्रावणभारती प्रशाला मुंगसवाडे कला शिक्षक किशोर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली  उत्कृष्ट पूर्ण झाले असे मत शिवसेना तालुका उपाध्यक्ष अमोल जायभाये यांनी व्यक्त केले कार्यक्रमप्रसंगी छात्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन दत्तात्रय धारकर ,अमोल जायभाये यांच्या हस्ते संपन्न झाले .

 यावेळी लहु दराडे,संदिप देशमुख,अशोक बुडगेवार, शाकीर पठाणसर,माजी सरपंच यशोदास सोनावने, फिरोज तांबोळी,प्रदिप जगताप,संतोष केळगंद्रे,पांडु लोंदे, अंबीर तांबोळी,किरण अंदुरे, शिवसेना शहर प्रमुख दिलीप ,अनुसे आदी खरवंडी कासार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रदीप पाटील उपसरपंच दिलीप पवळे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपअध्यक्ष मिथुन डोगंरे उद्योगपती बाबासाहेब ढाकणे राजेंद्र जगताप व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थाच्या वतीने शिवप्रतीमा पुजन झाले .

छत्रपती स्मारकाला रंगरंगोटी

खरवंडी कासार च्या वेशीच्या  ठिकाणी पुर्वी छत्रपती स्मारक बाधंकाम झाले आहे त्या स्मारकाला गावातील युवकानी राजकीय हेवा दावा बाजुला ठेवत सघंटीत राहत युवकामध्येच निधी सकंलन करत शिवजयंती निमीत्य  रंग रंगोटी करत ग्रामस्थाचे लक्ष वेधले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या