लोकनेता न्यूज
ऑनलाईन
न्यूज नेटवर्क
कोरोना कालावधीतील लॉकडाऊन मध्ये घरगुती वापराच्या ग्राहकांना अव्वाच्या
सव्वा वीज बील आले, या कालावधीतील सहा महिन्याचे वीज बील माफ
करावीत,अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठाकरे सरकारचे ऊर्जा
मंत्री यांनी 100 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करू अशी घोषणा
केली मात्र या घोषणेचा शासनासह पूर्णतः विसर पडला आहे, या
घोषणेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे
म्हणाले महावितरण कंपनी ७५ लाख विद्युत ग्राहकांचे कनेक्शन तोडून ६ कोटी
जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे. शासन मोगलाई असल्यासारखे वागत आहे,
इंग्रजांपेक्षा ही निष्ठुरतेने शेतकऱ्यांकडून वसुली करीत आहे,
या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, भारतीय
जनता पार्टी शेतकऱ्याच्या सोबत असून कोणाचेही विद्युत कनेक्शन तोडू देणार
नाही.यावेळी आंदोलकांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल लोहारे यांना निवेदन
दिले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, बापूसाहेब
पाटेकर, उमेश भालसिंग, माजी जि.प.
सदस्य बाळासाहेब सोनवणे, भिमराज सागडे, नवनाथ कवडे संदीप वाणी, सचिन वारकड,बाबासाहेब गोर्डे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण
नगरसेवक गणेश कोरडे, कमलेश गांधी, सागर
फडके, महेश फलके, विनोद मोहिते,
नितीन दहिवळकर, दिगंबर काथवटे,अंकुश कुसळकर, राहुल बंब, सुरज
लांडे, राजाभाऊ लड्डा, अमोल सागडे,
शुभम काथवटे आदी उपास्थित होते.
0 टिप्पण्या