Ticker

6/Breaking/ticker-posts

देवराईच्या सरपंचपदी प्रभावती पालवे, उपसरपंचपदी अक्षय पालवे

 

लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 करंजी:-पाथर्डी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या देवराई ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढती मध्ये प्रभावती राजेंद्र पालवे यांची सरपंच म्हणून तर अक्षय संभाजी पालवे या युवकाची उपसरपंच म्हणून निवड झाली आहे. युवानेते अनिल पालवे व माजी सरपंच रवीभूषण पालवे यांच्या गटाने ग्रामपंचायतवर सत्ता मिळवली आहे. सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी दरम्यान ग्रामपंचायत सदस्य योगिता गणेश गोरे, सुलभा किरण जाधव यांनी प्रभावती पालवे व अक्षय पालवे यांच्या बाजूने कौल दिल्याने ते या पदावर विराजमान झाले. सरपंच निवडीनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पालवे, युवानेते अनिल पालवे, माजी सरपंच भारती पालवे, रवीभूषण पालवे,भाऊसाहेब पालवे, साहेबराव पालवे, साहेबानाना पालवे, राजेंद्र पालवे, आदिनाथ पालवे, राहुल पालवे, प्रदीप पालवे, अतिशय क्षेत्रे, नारायण पालवे, बाळासाहेब कारखेले, संतोष पालवे, डॉक्टर गणेश गोरे, सविता पालवे, पुष्पा पालवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत या निवडीचे स्वागत केले.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या