लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर :-
·
अहमदनगरमध्ये विनामास्क
नागरिकांवर धडक कारवाई, 248 मंगल कार्यालयाला नोटीस
अहमदनगर : विनामास्क नागरिकांवर
धडक कारवाई, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची थेट
रस्त्यावर उतरून कारवाई, मंगल कार्यालय आणि महाविद्यालयात
छापेमारी, 248 मंगलकार्यालयाला नोटीस, तर 2 हजारापेक्षा ज्यास्त नागरिकांवर विना मास्कची
कारवाई, तब्बल 2 लाख 30 हजाराचा दंड वसूल, नियम न पाळल्यास कडक
कारवाईचा इशारा
शहरातील मंगल कार्यालये गर्दीने ओसंडून वाहत असून आता नव्या नियमावलीचा बडगा उगारला गेला आहे. कारण लग्न समारंभाची धूम सुरू असून त्याला अटकाव करण्याची जबाबदारी ही मंगल कार्यालयांची आहे. सावेडी तिल औरंगाबाद रोड वरील काल आचानक जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी बंदोबस्तात अचानक भेटी देऊन पाहणी केली असता तीन ठिकाणी ही स्थिति आढळून आली. त्यांना प्रत्येकी 5 हजाराचा दंड ठोठावन्यात आला.
कोरोंनाच्या वाढत्या संसर्गा मुळे प्रद्तिबंधात्मक उपाय योजण्यात येत आहेत, त्याची काटेकोर अमलबजावणी व्हावी , तसे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच दिले आहेत. तरी ते गांभीर्याने घेतले जात नाहीत., त्यामुळे आज दुपारी अचानक वसंत टेकडी येथील 2 सिटि लोण व ताज गार्डन आणि , आशीर्वाद, मंगल कार्यालयांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. तेंव्हा सोशल डिस्टंसचे उल्लंघन, मास्क नसणे आदि बाबी दिसून आल्या त्यामुळे सरसकट दंड आकारून कार्या लय चालकाना दनका दिला. त्यामुळे व्रहाडी मंडळींना धाक बसला आहे.
0 टिप्पण्या