लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी
आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच
पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली
टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात
चांगलेच चर्चेत आलेय. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते आणि वन मंत्री संजय राठोड यांचं
नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झालीय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं
शिवसेनेवर दबाव टाकण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे नेहमीच शिवसेनेची भूमिका स्पष्ट
करण्यात पुढे असलेले संजय राऊत यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिलाय.
पंकजा
मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी
आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच
पाहिजे, अशी मागणी केली आहे.
शिवसेनेची सावध प्रतिक्रिया
तर नगरविकास मंत्री एकनाथ
शिंदे यांनी या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिलीय
”झालेली घटना दुर्दैवी
आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर
बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे
म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलीय. शिवसेनेची या प्रकरणात ही
पहिलीच प्रतिक्रिया आहे.
0 टिप्पण्या