यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपन
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मोरयाचिंचोरे (ता.नेवासा) :- वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या
जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन शनिवार दि २७ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंत
सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांचे संकल्पनेतून साजरा झाला. प्रतिष्ठानने दत्तक
घेतलेल्या आदर्शगाव मोरयाचिंचोरेत ३६५ दिवस वृक्षारोपन करण्याचा उपक्रम हाती
घेतलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिक मंच सोनईचे सदस्य, यशवंत प्रतिष्ठान चालवत असलेल्या वाचनालयांचे प्रतिनिधी व स्थानिक
ग्रामस्थ यांच्या हस्ते आदर्शगाव मोरयाचिंचोरे येथे ५१ विविध वृक्षांचे वृक्षारोपन
करून वृक्ष व मराठी भाषा यांच्या संवर्धनाची शपथ घेतली.
यावेळी वड,पिंपळ,जांभूळ,कडू निंब,आदी देशी
झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले तसेच उपस्थितांनी यशवंत सार्वजनिक वाचनालयातील
विविध पुस्तके वनराईच्या सानिध्यात वाचनाचा आनंद घेतला याप्रसंगी उपस्थित होते.
मराठी भाषा दिनानिमित्त आदर्शगाव मोरयाचिंचोरेत यशवंत सामाजिक
प्रतिष्ठानच्या वतीने ५१ वृक्षांचे रोपन करत वृक्ष व भाषा हे आपल्या मातेसमान आहेत
त्यांचे आपण जतन व संवर्धन केले पाहिजे हा संदेश वृक्षारोपनातून देण्यात आला.
0 टिप्पण्या