Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईतील नाइट लाइफचं काय होणार ?; काय म्हणाले... आदित्य ठाकरे

 


लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

मुंबई:- करोनानंतर लवकरच आम्ही पुन्हा नाइट लाइफ सुरू करणार आहोत, अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केली. “मिशन बिगिन आगेन” सुरू केल्यानंतर आम्ही सर्व बाबी हळूहळू सुरू केल्या असून अध्याप तरी कोणतीही गोस्ट बंद करण्यात आलेली नाही, तशी वेळ आली नसल्याचे ठाकरे यांनी सांगून त्यामुळे नाइट लाइफदेखील लवकरच सुरू करू, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत गेल्या वर्षी २६ जानेवारीला नाइट लािफ संकल्पना अंमलात आणण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी लगेचच करोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन केल्याने नाइट लाइफ सुरू होताच बंद झाले. मात्र आता ते पुन्हा सुरी करण्याच्या हालचाली आदित्य ठाकरे यांनी सुरू केल्या आहेत. आता आपण रेस्टॉरंटला १ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी दिली आहे. हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत. अजूनपर्यंत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाइट लाइफदेखील लवकरच सुरू करू, असे ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या वर्षी २६ जानेवारीपासून मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉइंट, कालाघोडा या ठिकाणची हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर २४ तास खुले ठेवण्यात येत होते. हे सर्व त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले होते. मुंबईत नाइट लाइफ असावे ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्याआधी भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळातही त्यांनी ही संकल्पना मांडली होती. मात्र त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्त्वावर यावर निर्णय घेण्यात आला होता.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या