लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
आशिया खंडात अग्रेसर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेवर अनुसूचित जाती - जमाती प्रवर्ग मतदार संघातून अमित अशोक भांगरे बिनविरोध निवडून आले . अमित यांची जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात दमदार एंट्री झाली आहे . ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी जिल्हा बँकेवर अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले आहे . वडिलांप्रमाणेच अमित सुद्धा शांत संयमी व अभ्यासू असून आगामी काळात बँकेद्वारे जिल्ह्याचं राजकारण अनुभवणार आहे . कोपरगांव चे अमित कोल्हे व अमित भांगरे ही युवा मंडळी आता बँकेत युवकांचं प्रतिनिधित्व करणार आहेत . पदार्पणातच त्यांना मोठी संधी मिळाली आहे . निवडी नंतर युवकांनी मोठा जल्लोष साजरा केला
0 टिप्पण्या