लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : नगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र उसाचे आगार म्हणून ओळखला जातो . यंदा ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे . परिणामी गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात अजूनही उसतोड मजूरांअभावी तोड न झाल्याने प्रत्येक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शेकडो एकरातील ऊस उभा आहे . ऊसतोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे .
मुबलक पाणी असल्यामुळे साखर पट्ट्यात गतवर्षी ऊसाची ' लागवड मोठ्या प्रमाणात झाली . हुकमी उत्पनाचे पिक म्हणून शेतकऱ्यांची ऊस शेतीला पसंती असते . यंदा उत्पादनही भरघोस आहे मात्र ऊसतोडणी च्या समस्येने शेतऱ्यांना ग्रासले आहे . आधीच एफ आर पीच्या लचांडामुळं प्रत्येक कारखान्याचा वेग वेगळा भाव . त्यामुळे जो मिळेल तो पदरात पाडून घ्यावा लागतो . परवडण्याचा हिशोब न केलेलाच बरा अशी मानसिकता तयार झालेलीच असते . परंतु त्यासाठी वेळेत गाळप तरी व्हायला हवे , मात्र त्यासाठी कारखान्याचे उंबरे झिजवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .
त्या त्या कारखान्यातील गटा -तटाचे राजकारण सांभाळून कारखानदारांच्या मिनतवाऱ्या करण्याची नामुष्की ओढवते . कसं ही करून गाळप कराच यासाठी खट पट चालू असते . हार्वेस्टर द्वारे तोडणी काही ठिकाणी सुरु आहे . परंतु त्याला पट्टा पद्धतीची लागवड . तसेच सलग ५ - १० एकरी ऊस असणे गरजेचे असते . सर्वच शेतक ऱ्यांना ते शक्य होत नाही . शिवाय हर्वेस्टर च्या तोडणीमुळे उताऱ्यात होणारी घट आदि बाबींमुळे ऊसतोडणी मजूरांकडून होणे गरजेचे असते . मात्र मजूरांची टंचाई अन् मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन असे व्यस्त प्रमाण झाल्याने कारखाना व उत्पादकांसमोर हे संकट उभे राहिले आहे
ऊस नोंदणीबाबत दूरध्वनीवरून संपर्क साधूनही टोळी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कारखान्याच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उसाची टोळी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे जथेच्या जथे कारखान्यावर जात आहेत. मात्र, ऊसनोंदणी अधिकाऱ्यांकडून कोणतेही शाश्वत उत्तर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत संभ्रमावस्था आहे.
संबंधित अधिकारीही कुठलेही ठोस आश्वासन देत नसल्याने आपल्या उसाला तोड कधी मिळेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाला आता तुरे फुटण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. शेवटी हतबल होऊन टोळी देता का ? कुणी टोळी अशी विनवणी करण्याची वेळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवली आहे . उसाला तोड यावी, यासाठी सध्या धडपड सुरू आहे. नोंदणी केलेल्या उसाला ऊसतोड द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. ऊसतोडीतही राजकारण शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्यातून नाराजीचा सूर उमटू लागला आहे
ऊसतोडी टोळी मिळविण्यासाठी मन:स्ताप सहन करावा लागत असून, काही वेळा पैसेही मोजावे लागत आहेत. दरम्यान लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत .
0 टिप्पण्या