लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : - अयोध्येत श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी मदतीला ओघ सुरु झाला आहे. श्रीराम मंदिरास शहराचे आ. संग्राम जगताप यांंनी ५ लाख रुपये दिले आहेेेत .
ठी निधी संकलित केला जात आहे. आतापर्यंत १ हजार कोटीहून अधिकचा निधी संकलित झाला आहे. नुकतेच नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी पाच लाख रुपयांची देणगी शुक्रवारी देण्यात आली.
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत धर्म प्रसार सह प्रमुख डॉ. मिलिंद मोभारकर यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहप्रमुख दादा वेदक यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली. आयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी निधी संकलित करण्यात येत असल्याबाबत मोभाकर यांनी माहिती दिली.
आमदार संग्राम जगताप यांनी राम मंदिर निर्माणासाठी पाच लाखांच्या निधीचा धनादेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सुपूर्त केला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रविंद्र साताळकर, शहर संघचालक शांतीभाई चंदे, अभियानाचे जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे,शहर कार्यवाहक, हिराकांत रामदासी, मुकूल गंध, राजेश झंवर, नंदकुमार शिकरे, महेंद्र चंदे, श्रीकांत जोशी, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रणव हिंगे, सोहम शेटीया, आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या