Ticker

6/Breaking/ticker-posts

९ कोटी मंजूर : सावेडी नाट्यगृहाचे कामाला येणार वेग - आ . जगताप


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : - तमाम नाट्यप्रेमी व नगरकरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या महापालिकेच्या सावेडी नाट्यगृहासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ८ कोटी ९८ लाख ६६ हजार ५४५ रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली .

महापालिकेच्या सावेडी येथील जुन्या क्रीडा संकूला च्या जागी १००० आसन क्षमतेचे नाट्यगृहाचे काम सुरु आहे . सन २०१३ -१४ मध्ये ५०० आसन क्षमतेचे नाट्यग्र हास मंजूरी होती . भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन ते १००० क्षमतेचे करण्यात आले . 

काम सुरु झाल्यानंतर मधल्या काळात वर्षभरापासून ते निधीअभावी रखडले होते . विशेष बाब म्हणून निधी साठी आ जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता . त्या अनुषंगाने रस्ते दुरुस्ती अनुदानातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे . त्यामुळे रखडलेल्या या कामास गती मिळणार आहे .

याबाबत  बोलतांना आ . जगताप म्हणाले की . नाटय रसिक व नगरकरांच्या जिन्ताळ्याच्या नाट्य गृ्हासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुमारे ९ कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता दिली . त्यामुळे नाट्यग्रहाचा प्रश्न मार्गी लागुन वेगाने काम सुरु होऊन अदययावत असे नाट्यगृह नगरकरांच्या सेवेत सज्ज होईल .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या