Ticker

6/Breaking/ticker-posts

मोठी बातमी : .. भूकंप.. उत्तर भारत हादरला..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली :  दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा या पाच राज्यांमध्ये भूकंप झाला. हा भूकंप नेमक्या किती तीव्रतेचा आहे, त्याचा केंद्रबिंदू कुठे आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच भूकंपात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. 

 

 जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्लीत जोरदार झटके जाणवल्याची माहिती आहे.  या भूकंपाची तीव्रता 6 रिश्टर स्केल आहे. देशातील पाच राज्यांसह पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातीलही काही भागांमध्ये देखील भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहे. या भूकंपाचे केंद्र कोणतं आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

दरम्यान, भूकंपाची घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काही यूजर्सनी भूकंपाचे विविध फोटो शेअर केले आहेत. एका यूजरने जम्मू-काश्मीरमधील व्हिडीओ शेअर केला आहे. तर एकाने उत्तर भारतातील एका घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातीलही एका घरातील दृश्य दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या