Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर बाजार समितीच्या गेटला पुन्हा लागला टाळा .!

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमदनगर :-नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वाराचे एक गेट अडीच वर्षापासुन शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून  एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते.पण त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे गेट उघडण्याचे आंदोलन औट घटकेचेच ठरले आहे.

 कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेश द्वाराला दोन गेट आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यातील एका गेटचा उपयोग हा बाजार समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी केला जातो तर दुसऱ्या गेटचा उपयोग बाजार समितीमधून बाहेर पडण्यासाठी केला जातो.  गेल्या  ऑक्टोबर २०१८ ला शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतुकीस अडथळा असे कारण दाखवुन  बाजार समितीच्या बाहेर पडण्याचा गेटला कुलूप लावलेले होते. त्यामुळे वाहतुकदारांना जा-ये करण्यासाठी एकाच मार्गाचा वापर करावा लागत आहे. समितीचे दोन्ही गेट खुले असावेत यासाठी बाजार समितीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा वाहतूक नियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडेही गेट खुले करण्याबाबत वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाने त्यास दाद दिली नाही.

 मागील महिन्यात शिवसैनिकांनी शिवसेना स्टाईलने त्या गेटचे कुलूप तोडत  खुले गेले पण त्यानंतर आठवडाभरातच वाहतूक नियंत्रण शाखेकडून त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आलेले आहे. शिवसेनेचे गेट खुले करण्याचे आंदोलन औट घटकेचे ठरले असून, बाजार समितीच्या आत आणि बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग असल्याने त्या चौकात पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे. गेट बंद ठेऊन वाहतूक नियंत्रण शाखा  नेमके कशावर  नियंत्रण मिळवीत आहे ,हाच मोठा प्रश्न आहे.

 शहर वाहतूक नियंत्रण विभागाचे निरीक्षक विलास देवरे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना पत्राद्वारे कळवले आहे की, बाजार समितीचे गेट अनोळखी समाजकंटकांनी उघडले आहे. ते तात्काळ बंद करून त्या अनोळखी समाजकंटकांवर कारवाई करावी. प्रत्यक्षात ते शिवसैनिक कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. गेट उघडण्याच्या बातम्या फोटो सह सर्व वृत्तपत्रासह सोशल मीडिवर प्रसारीत झालेल्या आहेत. मग वाहतूक शाखेसाठी ते शिवसैनिक अनोळखी कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्व प्रकारामुळे मोठा पेच निर्माण जहाला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या