Ticker

6/Breaking/ticker-posts

चेक भरताना ‘या’ चुका टाळा, बँक खाते 'सेफ' करा ..


 


 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

मुंबई : -  सध्या सायबर  क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चोरटे रोज नवनवीन क्लृप्त्या शोधून अनेकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. एकीकडे ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे ऑनलाईन पद्धातीने लोकांची होणारी लूटमार आजकाल गंभीर विषय झाला आहे. चेकच्या माध्यमतून पैशांचे व्यवहार करतानासुद्धा अनेक प्रकारे धोका होऊ शकतो. त्यामुळे चुका टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करून आपले बँक खाते सेफ ठेवावे .



 ऑनलाईन  फसवणूकीची अनेक उदाहरणंही होऊन गेली आहेत. चेक मध्ये लिलया बदल करून बँकेतून  वटाविल्याच्या घटना घडत आहेत . त्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोक्यांना समोर ठेवून पंजाब नॅशनल बँकेने चेकद्वारे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी काही निर्देश दिले आहेत. 



पंजाब नॅशनल बँकेने  (PNB) सांगितले आहे कीकोणालाही चेकद्वारे पैसे देताना विशेष गोष्टींची काळजी घ्या. सर्वप्रथम चेक भरताना पर्मनंट पेनचा वापर करावा. जेल पेनपेन्सिल किंवा स्केच पेनचा वापर करु नये. तसेच चेक भरुन झाल्यानंतर चेक टाकताना ड्रॉपबॉक्स तपासून बघावा. जुने चेक नष्ट करण्याचा सल्लाही पंजाब नॅशनल बँकेने दिला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या