गणोरे ग्रामपंचायतीला आर.आर.(आबा) सुंदर गाव ग्राम योजनेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अ .नगर : अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील आढळा खोऱ्यात पंचक्रोशीमध्ये मोठी असलेली ग्रामपंचायत गणोरे आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे आणि विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी यासाठी नावाजली जाते. लोकसहभाग, पारदर्शक व गतिमान कारभार असल्याने स्मार्ट ग्राम अर्थात आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेत 2019-20 साठी गावाने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे.
गावातील पंचकमिटी, ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांनी नगरमधील कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी जि.प.अध्यक्षा राजश्री घुले पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत गणोरे मार्फत गाव पातळीवर जनतेच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती खर्चात बचत, एटीएम द्वारे पिण्याचे पाणी, आय एस ओ मानांकन, जिल्हा परिषद शाळा आय एस ओ, वृक्ष लागवड, कोविड 19 वरील उपाय योजनांची यशस्वी अंमलबजावणी, लोकसहभागातून गावात 57 लाख रुपयांची विकास कामे, सीसीटीव्ही कॅमेराद्वारे संपूर्ण गाव एकाच छताखाली, वाय-फाय सेवा, ग्रामपंचायतीचे संपूर्ण कामकाज लेखे ऑनलाइन प्रणाली उपलब्ध, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा उत्कृष्ट सेवा दिल्या जातात. तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन दहा लक्ष रुपयांचे पारितोषिक घेऊन जिल्हास्तरावरही प्रथम क्रमांकाने गणोरे ग्रामपंचायत उत्तीर्ण झाली. सर्व ग्रामस्थ गावकरी, आजी-माजी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे मान्यवर, ग्रामविकास अधिकारी यांच्या विशेष प्रयत्नाने गणोरे गाव सुंदर आकर्षक मॉडेल व्हीलेज झालेले आहे.
या पुरस्कारानंतर गावामध्ये सातत्यपूर्ण प्रक्रिया चालू ठेवून विकासाची घोडदौड अविरतपणे चालू राहील.अशा प्रकारचे ग्वाही, स्मार्ट ग्रामचे सरपंच संतोष आंब्रे,उपसरपंच प्रदीप भालेराव,माजी सरपंच वंदना दातीर,माजी उपसरपंच राजेंद्र आंब्रे व सर्व आजी-माजी पंच कमिटीने दिली आहे.या पुरस्काराबद्दल आमदार किरण लहामटे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी आमदार वैभव पिचड, जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे, कैलास वाकचौरे नामदेव आंब्रे, सभापती उर्मिलाताई राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी, तहसीलदार मुकेश कांबळे आदींनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
0 टिप्पण्या