सेंन्ट्रल बँक जामखेड शाखेकडुन पीएम स्वनिधी व पिक कर्ज वाटप
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
साकत ( ता . जामखेड ) : - सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना बॅकाचा मोठा आधार आहे . त्यात सरकारने शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे धोरण अवलबून तसे आदेश बँकाना दिले आहेत , त्यात राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने यंदा शेत पीक कर्जाची मागणी ही मोठी होती. असे असतांना देखील जामखेड शाखेने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याना सुमारे अडीच कोटीच्या वर पीक कर्ज मंजूर करून दिलासा दिला आहे .
सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या जामखेड शाखेने , पिंपळवाडी , कोल्हेवाडी , कडभनवाडी , मोहा , लेहेनेवाडी , भुतवडा , हपटवाडी रेडेवाडी , बटेवाडी , नानेवाडी गावामध्ये १ एप्रिल ते आज पर्यत ३४७ शेतकऱ्यांना २ कोटी ५७ लाखा पिक कर्ज वाटप केले आहे तसेच पीएम स्वनिधी योजना मार्फत १५० छोट्या व्यवसाईकाला कर्ज दिले आहे. अशी माहिती बँकेचे शाखा प्रबंधक संजय कराड यांनी दिली .
सेंन्ट्रल बँक ऑफ इंडियाने १० गावे दत्तक घेतली असून या गावातील शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले . डिसेंबर महिन्यात २६ शेतकऱ्यांना २६ लाखा कर्ज वाटप केले . तसेच लॉकडाऊनच्या काळात छोटे व्यवसाईक रोडच्या कडेला हातगाडी लावून फळे , फुले , चाहाची गाडी अदी व्यवसाय फार फटका बसला त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारने पीएम स्वनिधि योजना सुरू केली या योजने मार्फत १५० व्यवसायकाला दीड लाख कर्ज वाटप केले .
त्यासाठी बँकेतील उपशाखा अधिकारी अशोक बाचकर ,कॅशियर गणेश शेटे ,सूर्यकांत कुंभार, विजयालक्ष्मणी ताई बाळासाहेब वाधवणे , विनोद घायतडक या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यमुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप व पिएम स्वनिधि योजनचे कर्ज वाटप शक्य झाले आहे असे शाखा प्रबंधक संजय कराड यांनी सांगीतले
याबाबत शेतकरी डॉ . सुनिल वराट यांनी अधिकाऱ्यांनी बँकेत हेलपाटे मारून दिले नाही सर्व कर्मचाऱ्यांची ग्राहकांशी असणारी माणुसकी आपुलकी प्रेमाने सांगणे त्यामुळे शेतकऱ्यांची हेंडसाळ होत नाही सांगितले .
कर्ज घेण्यासाठी बँकेत अनेक फेऱ्या माराव्या लागतात मात्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये माझे पिएम स्वनिधि प्रकरण ताबडतोप मंजुर करून लगेच कर्ज वाटप केली. या बँकेच्या उपक्रमाचा इतर बँकांनी आदर्श घ्यावा . अशी प्रतिक्रिया गोकूळ भस्मे या छोट्या व्यावसायिकाने नोंदविली .
0 टिप्पण्या