Ticker

6/Breaking/ticker-posts

जबरदस्त फीचर्ससचा स्मार्ट फोन उद्या होणार लाँच..



या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये 

लोकनेता न्यूज 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नवी दिल्लीः आयटेल इंडियाने आपला आणखी एक नवीन बजेट स्मार्टफोन itel A47 ला भारतात लाँच केले आहे. या फोनमध्ये मोठी डिस्प्ले आणि जबरदस्त फीचर्स मिळणार आहेत. या फोनमध्ये ५.५ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय ड्यूल सिक्योरिटी फीचर (फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर ) दिला आहे.

itel l A47 स्मार्टफोनची किंमत
या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विक्री ५ फेब्रुवारी पासून अॅमेझॉन इंडियावर दुपारी १२ वाजेपासून केली जाणार आहे. या फोनला ईएमआय वर सुद्धा खरेदी करता येऊ शकते. या फोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. हा फोन दोन व्हेरियंट कॉस्मिक पर्पल आणि आईस लेक ब्लू कलर मध्ये खरेदी करता येऊ शकतो.

itel A47 फोनची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये अँड्रॉयड पाय ९.० मध्ये ५.५ इंचाचा एचडी प्लस फुल स्क्रीन दिली आहे. ज्यावर २.५ डी कर्व्ड ग्लास दिला आहे. डिस्प्लेचे पॅनल आयपीएस आहे. फोनमध्ये 1.4GHz चे क्वॉडकोर प्रोसेसर दिला आहे. कंपनीने मॉडल संबंधी जास्त माहिती दिली नाही. फोनमध्ये २ जीबी रॅम सोबत ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकतो.

itel A47 चा कॅमेरा आणि बॅटरी
या फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात एक लेन्स ५ मेगापिक्सलचा आणि दुसरा आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यासोबत स्मार्ट रिकग्निशन, पोर्ट्रेट मोड, ब्यूटी मोड सारखे फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये 1440x720 पिक्सल रिजॉल्यूशन व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3020mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच फेस अनलॉक शिवाय फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

आयटेल इंडियाने itel A47 स्मार्टफोन भारतात लाँच 

पहिला सेल अॅमेझॉनवर ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता आहे.

         

·         

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या