Ticker

6/Breaking/ticker-posts

गॅस वाढविरोधी ‘ वंचित’ चे आंदोलन मागे

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

जामखेड :-वंचित बहुजन आघाडी व लोक अधिकार आंदोलन जामखेड तालुक्याच्या वतीने गॅस ग्राहकांची लूट थांबवण्यासाठी अॅड.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते त्यानुसार तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या आश्वासनातर वंचित चे आंदोलन मागे घेण्यात आले.

 

          गॅस ग्राहकांची दिवसान दिवस लुटमारी चालूच आहे, व नुकतीच गॅस सिलेंडरची 25 रुपयेनी दरवाढ करण्यात आली आहे, ती तात्काळ शासनाने रद्द करण्यात यावी, व गॅस एजन्सी पासून 5 किलोमीटर अंतरावरती गॅस सिलेंडर मोफत डिलिव्हरी करण्यात यावी, त्याचा कोणत्याही प्रकारचा चार्जेस घेण्यात येऊ नये तसेच गॅस सिलेंडर डिलिव्हरी देताना गॅस सिलिंडरचे वजन करून डिलिव्हरी घरपोच देणे, या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.

 

           यावेळी या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रा. मधुकर (आबा) राळेभात, नगरसेवक अमित जाधव, नगरसेवक मोहन पवार, ,डवरी गोसावी समाजाचे जामखेड तालुका अध्यक्ष अजिनाथ शिंदे, आदिवासी पारधी समाजाचे नेते  विशाल पवार ,द्वारकाताई पवार ,बाळगव्हाणचे उपसरपंच राहुल गोपाळघरे, इत्यादींच्या  वतीने या आंदोलनास पाठिंबा    देण्यात आला.


       यावेळेस मोठया प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी  वंचित  व लोकाधिकारच्या प्रमुख व  गॅस एजन्सीचे पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन तहसीलदार विशाल नाईकवाडे  यांनी दिले त्यानुसार हे आंदोलन मागे घेतल्याचे ऍड अरुण जाधव यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या