Ticker

6/Breaking/ticker-posts

अहो.. आश्चर्यम : ‘ पाटबंधारे’ची जमिन पुन्हा प्रकटली.. महसुल व पाटबंधारे संशयाच्या भोवर्यात..!

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नेवासा फाटा:- कुकाणा ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पाटबंधारे विभागाची तीन एकर जमिन पुन्हा प्रकट झाली असुन हि जमिन लाटण्यामागे महसुल यंत्रणेचा हात असल्याचे उघड झाले आहे, मात्र  दोषींवर  कारवाई करण्याऐवजी या प्रकरणावरच पांघरून घालण्याचा केविलवाना प्रयत्न महसुल यंत्रणेकडून केला जात आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आपली कोटयावधी रूपयांची मालमत्ता हडपली जाऊ लागली असतांनाही पाटबंधारे विभागाने चुप्पी साधली आहे, त्यामुळे महसुल व पाटबंधारे हे दोन्ही विभागही संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत.

         याबाबत अधिक माहिती अशी की , कुकाणे  पाटबंधारेची तीन एकर जमीन उता-यावरून गायब होणे,दूस-याच दिवशी या सरकारी जमिनीचा विक्री व्यवहार होणे त्याकडे ग्रामस्थांनी निवेदन दिल्यानंतर महसुल यंत्रणेने दखल घेणे तर पाटबंधारे विभागाने खडबडून जागे होत धावपळ करणे  हे सर्व प्रकार संशयास्पद असून महसूल व पाटबंधारे विभागाच्या संगनमतानेच कोटयावधी रूपयांची हि सरकारी मालमत्ता हडप करण्याचा हा डाव मात्र कुकाणे ग्रामस्थांच्या जागरूकपणाने उधळण्यात आला व सरकारची जमिन बळकावण्याचा प्रकार हाणुन पडला.वास्तविक बघता पाटबंधारे व महसूल यंत्रणेने सरकारची जमिन वाचवण्याऐवजी कुकाणे ग्रामस्थांनी हि जमिन वाचवण्यासाठी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.  कुकाणे    पाटबंधारेची सरकारी जमिन घशात घालुन कोटयावधीची सरकारी मालमत्ताच हडपण्याचा डाव ग्रामस्थांनी हाणुन पाडला खरा पण सरकारी यंत्रणेतल्याच हा प्रकार करणा-या  घरभेदयाचे काय? असा सवाल ग्रामस्थ करत आहे.

 

       सरकारची कोटयावधी रूपयांची मालमत्ता हडपण्याचा एवढा मोठा प्रकार होऊनही  याचे गांभिर्य ना पाटबंधारेला ना महसूल यंत्रणेला.नेमके या सर्व प्रकारामागे कोण? हे मुळ शोधण्याऐवजी त्यावर पडदा टाकण्याचा प्रकारही संशयास्पदच आहे.हि जमिन आपलीच हे सिदध करण्यासाठी पाटबंधारे विभागाचीही दाणादाण झाली.मात्र हे कोणी अन कशासाठी केले? याचा उलगडा करण्याची तसदीही पाटबंधारे विभाग करत नसेल तर संशयाची सूई पाटबंधारेकडेही वळू शकते.यावर पाटबंधारेने केवळ जमिन आमचीच आहे हे सिदध करण्याचा खटाटोप केला पण कोणी व कशासाठी हा गंभीर प्रकार केला यासाठी तक्रार करण्याची हिम्मत पाटबंधारेने दाखवण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या