नगर लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर : जिद्द आणि मेह्रनत करण्याची तयारी असेल तर कोण तिही परिस्थिती तुम्हाला यशापासून रोखू शकत नाही हे येथील शिवाजीनगर मध्ये राहणारे शिवाजी उत्तम गिते यांचा मुलगा समाधान याने सीए ची परिक्षा पास करून दाखवून दिले आहे .
गिते कुटूंब हे मुळचे आष्टी तालुक्यातील पांगूळगव्हान या गावचे काही वर्षापूर्वी ते मोल मजूरीसाठी नगरमध्ये दाखल झालं समाधान चे वडिल शिवाजी हे येथील मार्केट यार्ड मध्ये हमाली करतात तर आई मिळेल ते काम करून प्रपंच चालवितात मात्र अशा परिस्थित ही त्यांनी मुलांना शिक्षण दे याचं काम चालू ठेवलं . समाधाननं बीकॉम करून गेले तीन वर्षापासून सीएची परीक्षा देत राहिला .सुरवातीला अपयश आलं तरी खचून न जाता नेटाने प्रयत्न सुरूच ठेवले व नूकत्याच झालेल्या परिक्षेत पास होऊन आई वडिलांच्या कष्टाच र्चिज केलं . त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे .
0 टिप्पण्या