Ticker

6/Breaking/ticker-posts

“जब जब मै बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ ’’ -धनंजय मुंडे

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 

सांगली : तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, बदनाम करने की, “जब जब मै बिखरा हूँ,  दुगनी रफ्तार से निखरा हूँ  ’’  अशी शायरी धनंजय मुंडेंनी इस्लामपूरमधील कर्मवीर ज्ञान प्रबोधनीमधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात कार्यक्रमा दरम्यान  म्हणत अनेकाना इशारे दिले.

 

मी कधीच माझ्या जीवनात भान हरपून बोललेलो नाही. भान ठेवूनच बोललो आहे, असे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. इस्लामपूरमधील कर्मवीर ज्ञान प्रबोधनीमधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला धनंजय मुंडेंनी हजेरी लावली.  या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडेंनी शेरोशायरी म्हणत अनेक इशारे दिले.

इस्लामपूरमधील कर्मवीर ज्ञान प्रबोधनीमधील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला धनंजय मुंडे अध्यक्ष होते. यावेळी मुंडेंनी भाषण केले. या भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी त्यांच्या आवडती शायरी म्हटली.  येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण त्याचआधी त्यांच्याकडे अशी काय माहिती आहे. ज्यामुळे सरकार पळ काढणार हे लक्षात येत नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले

देशात कोरोनाचे वाढत आहेत. तेही चंद्रकांत पाटील आणि सदाभाऊ खोत यांना काय म्हणावं? अशी टीका धनंजय मुंडेंनी केली.  विरोधी पक्षाचे विषयावर पळ काढायचा विषय नाही, असेही ते म्ह्णाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या