लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सुपा: (ता. पारनेर ):-जिल्हयातील पहिल्या सीएनजी
पंपाचे उदघाटन झाल्यानंतर आता पारनेर नगरपंचायत हद्द तसेच सुपे आद्योगिक वसाहतीस
पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठा करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले
यांनी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या
सुचनेनुसार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले पारनेर शहर व सुपे औदयोगिक वसाहतीस
प्राधान्य देण्याचे आदेश दिले.
भारत पेट्रोलियमचे आदित्यकुमार यांनी यावेळी
बोलताना नगर व औरंगाबाद जिल्हयात प्रत्येकी ८ ते ९ सीएनजी पंप सुरू
करण्यात येणार असल्याचे सांगितले. आ. नीलेश लंके यांच्या सुचनेनुसार व
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार पारनेर शहरात
घरगुती वापरासाठी तसेच सुपे औदयोगिक वसाहतीसाठी पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस
पुरवठा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
0 टिप्पण्या