लोकनेता
न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
यावेळी कर्जत जामखेड चे प्रमुख मधुकर राळेभात, जामखेड पंचायत समिती सभापती सूर्यकांत
मोरे,राष्ट्रवादी चे
तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, मुख्यकार्यकारी
अधिकारी विशाल भोसले, युवा उद्योजक रमेश
आजबे,जवळा गावाचे सरपंच
प्रशांत शिंदे, माजी उपसभापती
दीपक पाटील, मुंजेवाडी चे
सरपंच जानकाबाई ठकाण, बाबासाहेब महारनवर, जवळा ग्रामपंचायत सदस्य शब्बीर सय्यद,दयानंद कथले, प्रदीप दळवी, अशोक पठाडे, राहुल पाटील,पोपट बारस्कर, शिवराज देवमुंडे,प्रल्हाद झारगड, बाजीराव खाडे, शीतल झारगड,प्रा. डॉ. सुधीर इंगळे, राख सर, कर्जत जामखेड
एकात्मिक विकास संस्थाचे महाव्यवस्थापक संतोष देशमुख, व्यवस्थापक धनंजय ठाकरे , प्रकल्प कॉर्डिनेटर आकाश घोडके, सुशांत जगताप, अमित पवार आदी उपस्थित होते.
आमदार रोहित पवार
म्हणाले कि,गावाचा विकास
करायचा असेलतर लोकसहभाग महत्वाचा आहे. मुंजेवाडी येथील ग्रामस्थांनी दररोज दोन तास
श्रमदान केले तर उर्वरित २०० घनमीटर काम हे ४ दिवसात पूर्ण होणार आहे.हे काम पूर्ण
झाल्यावर एकूण ७६७ घनमीटर काम होणार यामध्ये साडे सात लाख लिटर पाणी साठवणूक होणार
आहे. याचा फायदा मुंजेवाडी गावाला होणार आहे.हे काम पूर्ण झाल्यावर नाबार्ड
अंतर्गत विविध योजना गावासाठी घेता येतील युवा उद्योजकांना व बचत गटांना देखील कमी
व्याजदरात कर्ज उपलब्ध करत आहेत.याचा फायदा नागरिकांनी घेणे महत्वाचे आहे.तसेच
मुंजेवाडी गावातील रस्ते, मागेल त्याला
शौचालय, ग्रामपंचायत
सचिवालय मंजूर करणार आहे. तसेच जलजीवन योजने अंतर्गत ५० लाखांचा निधी देखील
प्रस्तावित असल्याचे हि आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
श्रमदान मधून
करण्यात आलेले सीसीटी, डीप सीसीटी, दगडी कंटूर बांध, बांधबंदिस्ती करण्यात आले. या श्रमदानाला
राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी आले होते.यावेळी १२५ राष्ट्रीय सेवा
योजनाचे माजी विद्यार्थी व
मुंजेवाडी लोकसहभाग द्वारे एक हजार हेक्टर वरील 4 दिवसात 527 घन मीटर काम पूर्ण
करण्यात आले आहे.यावेळी राख यांनी प्रास्ताविक केले तर आभार बाबासाहेब महारनवर
यांनी मानले.
आमदार रोहित पवार यांची बैलगाडीतून मिरवणूक.
मुंजेवाडी ग्रामस्थांनी आमदार रोहित पवार यांची बैलगाडीमधुन गावातून मिरवणूक काढण्यात
आली.त्यामुळे अनोख्या पद्धतीने आमदार रोहित पवार यांची ग्रामस्थांनी मिरवणूक
काढल्यामुळे आमदार रोहित पवार भारावून गेले.
या अधिकारी दाम्पत्यानी घेतली १३० शौचालय बांधण्याची जबाबदारी.
मुंजेवाडी गावचे सुपुत्र विशाल भोसले मुख्यकार्यकारी
अधिकारी नगरपंचायत माजलगाव
व त्यांच्या पत्नी गटविकास अधिकारी भोसले यांनी येत्या एप्रिल पर्यंत गावातील १३० शौचालय पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली आहे.यासाठी
प्रशासनातील अनुभवाचा वापर गावासाठी करणार असल्याचे या दांपत्याकडून सांगण्यात आले
व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित एप्रिल महिन्यात हागणदारीमुक्त गाव हा
कार्यक्रम घेणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
0 टिप्पण्या