लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबईः सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण या
तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षानं हा मुद्दा
उचलून धरला आहे. तर, राज्यातील महाविकास आघाडी आणि
शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
केली आहे. अखेर या सर्व प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवडी येथे
ट्रान्सहार्बर कामाची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पूजा चव्हाण
आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल ,त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. पण, गेले काही दिवस काही महिने
लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे प्रकारही समोर आले आहेत.
या प्रकरणात तसं काही होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी
करुन सत्य जनतेसमोर आणले जाईल,' अशी माहिती
मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
भाजप आक्रमक
पूजा चव्हाण कथित आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी आपल्या ताकदीचा वापर करून या प्रकरणी तपास करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत
पाटील यांनी केली आहे. तर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चौकशी झलिच पाहिजे अशी मागणी केली होती. प्रदेश उपाध्यक्ष चित्रा
वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली
आहे.
बीड जिल्ह्यातील परळी या गावची असलेली पूजा
चव्हाण काही दिवसांपूर्वी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती.
भाऊ आणि मित्रासोबत ती वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी तिनं इमारतीवरून उडी
मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली
होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध
असल्याचे आरोप झाले. मात्र, पूजानं मानसिक तणावातून
आत्महत्या केल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
0 टिप्पण्या