Ticker

6/Breaking/ticker-posts

बोल्हेगाव रस्त्याचे काम दर्जेदार करुन घेणार : नगरसेवक कुमारसिंह वाकळे

 बालिकामश्रम रोड ते बोल्हेगाव रस्त्याच्या कामाला सुरुवात


लोकनेता न्यूज 
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमनगर: बोल्हेगावच्या विस्तारीकरणासाठी व विकासासाठी आ. संग्राम जगताप यांनी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बालिकाश्रम रोड, सीना नदी ते बोल्हेगाव गावठाण पर्यंतच्या
रस्त्यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला होता. बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणा
दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम निकृष्ट झाले होते. त्यामुळे या रस्त्यावर पुन्हा खडडे पडले आहे. आम्ही या
रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार प्रशासनाकडे केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या
रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यात आल्यानंतर ठेकेदाराने या कामाला पुन्हा सुरुवात केली
असून या रस्त्याचे काम दर्जेदारच करुन घेणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक कुमारसिंह वाकळे
यांनी केले.

आ. संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बालिकाश्रम रोड ते बोल्हेगाव
गावठाण रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. या कामाची पाहणी
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केली. यावेळी बांधकाम विभागाचे इंजि. हंसराज रणधीर, महेश
वाकळे, मारुती कापडे, सावळाराम कापडे, ज्ञानेश्वर आढाव, रावसाहेब वाटमोडे, अँड. किरण
कातोरे, नगरसेवक राजेश कातोरे, दत्तु वीरकर, मुन्ना शेख, शंकर जारकड, बबनराव कराळे,
हरिदास वाटमोडे, संतोष वाटमोडे, संदेश सोनवणे, प्रसाद लिपाणे, प्रशांत बेल्हेकर आदी उपस्थित
होते.

यावेळी बोलताना कुमार वाकळे म्हणाले की, रस्त्याचे काम झाल्यानंतर ठेकेदाराकडे ५ वर्षे
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम असते. त्यामुळे या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून पुन्हा चांगल्या दर्जाचे
करुन घेण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालत आहे. ४0 वर्षानंतर या रस्त्याच्या कामाला आ.
संग्राम जगताप यांच्यामुळे सुरुवात झाली आहे. बोल्हेगावच्या विकासाच्या दृष्टिने हा रस्ता अत्यंत
महत्त्वाचा आहे. या रस्त्यामुळे नगर शहरात जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण होणार आहे.
भविष्यकाळात हा रस्ता बोल्हेगावचा मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. यावरती लवकरच
पथदिवे बसविण्यात येणार आहे. बायपासला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे व्यवसायाला चालना
मिळणार असल्याचे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या