Ticker

6/Breaking/ticker-posts

परीक्षाबाबतचा दिल्लीचा’तो’ निर्णय महाराष्ट्रातही लागु करावा

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 नवी दिल्ली :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिल्ली सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय. दिल्लीत तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे विद्यार्थ्यांचं मूल्यांकन होणार आहे. अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रातही घ्यावा अशी मागणी आता जोर धरायला लागली आहे.

दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका वृत्तवाहिनीसला दिलेल्य माहितीनुसार आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डिटेन्शन पॉलिसीअंतर्गत पुढील वर्गात प्रमोट करण्यात येईल. परंतु विद्यार्थ्यांना सेमी ऑनलाईन क्लासेसमध्ये काय शिकवण्यात आले, हे देखील समजणे गरजेचे असून त्या आधारावर आम्हाला पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी करता येईल. त्यामुळेच आम्ही या वर्षी आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं वर्षभरात केलेल्या वर्कशीट आणि असाईनमेंटच्या आधारे मूल्यांकन होणार आहे.

राज्यात सातारा, लातूर, वाशिम अशा जिल्ह्यात विद्यार्थीच कोरोनाबाधित आढळल्यानं राज्यात आधीच चिंता वाढली आहे. पण राज्य सरकार मात्र अजूनही ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम दिसतंय. त्यामुळे दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही निर्णय व्हावा अशी मागणी जोर धरायला लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या