लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:-
आशिया खंडात अग्रेसर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून सहमती चे निकराचे प्रयत्न चालविले आहेत. अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून
इच्छुकांची एकच धांदल उडाली आहे तर समेट घडून आणण्यासाठी
इच्छुकांची मनधरणी करता -करता नेतेमंडळींची
दमछाक झाली आहे. कोण कुठे व कशी माघार घेते यावर त्या त्या मतदार संघातील चित्र स्पस्ट होईल. तथापि पदद्याआड राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला असून अखेर बँक बिनरोध होते कि निवडणूक याचा फैसला आज होणार आहे .
विविध मतदारसंघातील एकुण २१ जागा असून ४ जागा आत्तापर्यंत बिनरोध झाल्या आहेत. राहिलेल्या १७ जागांपैकी कोपरगाव बिनविरोध झाल्यात जमा आहे . आता उर्वरित १६ जागांचा निर्णय होणार आहे. दरम्यान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कर्जतमधील महिला व सेवा सोसायटी वगळता १५ जागांवर आपल्या गटातील इच्छुकांचे मन वळविण्यात आल्याची माहिती आहे. थोरात गटाने अंतिम टप्प्यात माजी मंत्री विखे पाटील गटाविरुद्ध जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. बँकेसाठी यापूर्वीच सेवा मतदार संघातील राहता- अण्णासाहेब म्हस्के , शेवगाव - चंद्रशेखर घुले ,पाथर्डी आ. मोनिका राजळे व जामखेड - जगगनाथ राळेभात किंवा अमोल राळेभात अशा ४ जागा बिनरोध झाल्या आहेत. त्यात कोपरगाव मधून विवेक कोल्हे यांचीही काल बिनविरोध झाली आहे. राहिलेल्या जागांबाबत आज निर्णय होणार आहे
दरम्यान माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी भाजप च्या माध्यमातून पॅनल उभा करून रंगात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना फारसी साथ मिळताना दिसत नाही . तसेच बँकेसाठी निवडणूक टाळण्याचा प्रयत्न स्थानिक नेते मंडळींचा राहिला आहे. त्यास यश येताना दिसत आहे. विखे गटाचे काही मत्त्ताबर नेते थोरात यांच्या सहमतीला राजी झाल्याने विखे पाटलांच्या रणनीतीला मर्यादा आल्या आहेत. तरीही गेल्या वेळ्यासारखी ऐ नवेली पडद्यामागे काय काय घडामोडी घडतात त्यावरच बिनरोध हे गणित अवलांबून आहे . काय होते त्यासाठी दुपारपर्यंत थांबावे लागेल
0 टिप्पण्या