Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ठाकरे सरकार आपल्या वादग्रस्त मंत्र्यांना पाठिशी घालतंय’, -शर्मिला ठाकरें

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या या प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा नावाच्या महिलेने गंभीर आरोप केले होते. त्यावेळी मुंडेंनी आपलं संबंधित महिलेसोबत लग्नबाह्य संबंध असल्याचं फेसबूकवर स्पष्ट केलं होतं. मात्र, संजय राठोड गेल्या अकरा दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. या दोन्ही प्रकरणांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली.


शर्मिला ठाकरे आज वसईत माघी गणेश दर्शनासाठी आल्या होत्या. याशिवाय या ठिकाणी हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं

शर्मिला ठाकरे नेमकं काय म्हणाल्या?

पूजा चव्हाण आत्महत्या या प्रकरणात अनेकांची नावे येत आहेत. सर कार वाद ग्रस्त मंत्र्यना पाठिशी घालतय .मात्र तपास योग्य दिशेने होत नाही. पोलिसांनी योग्य दिशेने या सर्व प्रकरणाचा तपास करणं गरजेचं आहे”, अशी भूमिका शर्मिला ठाकरे यांनी मांडली.

लोकांची कामे सरकारच्या दरबारात होत नसल्याने, लोक राज ठाकरेंच्या दरबारात सरकारनेही बाहेर उतरुन जनतेची कामे केली पाहिजेत”, असा टोला शर्मिला ठाकरे यांनी यावेळी ठाकरे सरकारला लगावला.


राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का?

शर्मिला ठाकरे यांना यावेळी पुन्हा लॉकडाऊन लागू होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. नागरिकांचं आयुष्य महत्त्वाच आहे. त्याचबरोबर नागरिकांची नोकरीही महत्त्वाची आहे. याशिवाय ज्यांच्या कोरोनाकाळात नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना सरकारने आर्थिक मदत दिली पाहिजे”, असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या