Ticker

6/Breaking/ticker-posts

तृप्ती बर्वेचे यश हे जिल्हयासाठी अभिमानास्पद - सुजित झावरे

















वासुंदे (ता.पारनेर)कु.तृप्ती सुभाष बर्वे हीचा सत्कार करताना सुजित झावरे पा. बा.ठ झावरे,संपत झावरे,सगाजी दाते,रामचंद्र झावरे,भाऊसाहेब सैद,दिलीप पाटोळे,सुभाष बर्वे,ग्रा.सदस्य बाळासाहेब शिंदे, किशोर साठे, बाळासाहेब झावरे पा., बाळासाहेब झावरे, मारुती उगले आदी (छाया -दादा भालेकर)

तृप्ती बर्वे NETपरीक्षेत देशात १२४वी आल्याबद्दल  वासुंदे ग्रामस्थांकडून कौतुक व सत्कार


लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळी ढोकेश्वर :पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील प्राथमिक शिक्षक  सुभाष सीताराम बर्वे यांची सुकन्या व श्री हरेश्वर विदयालयाचे मुख्याध्यापक मधुकर सीताराम बर्वे यांची पुतणी कु. तृप्ती सुभाष बर्वे हिने नुकत्याच JOINT CSIR-UGC कडून घेतल्या जाणाऱ्या NET या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत LIFE SCIENCE या विषयात JRF मिळवुन दैदीप्यमान यश संपादन करून संपूर्ण देशात १२४ वा क्रमांक मिळवून वासुंदे गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवून गावची एक वेगळी अस्मिता निर्माण केली आहे.


या परीक्षेला देशातून जवळपास ९७७७२ मुले बसली होती. वासुंदे गावच्या वतीने कु.तृप्ती सुभाष बर्वे हीचा सत्कार समारंभ सुजित झावरे पाटील यांचे हस्ते करण्यात आला, अश्याच प्रकारचे यश या पुढील काळात तृप्तीला मिळत राहो ,अश्या प्रकारची शुभेच्छा संपूर्ण गावच्या वतीने दिल्या,आणि आजच्या तरुण पिढीने तृप्तीचा आदर्श घेण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांना केले.


यावेळी बा.ठ झावरे,संपत झावरे,सगाजी दाते,रामचंद्र झावरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून तृप्तीचे अभिनंदन करून तीला भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या, भाऊसाहेब सैद,दिलीप पाटोळे,सुभाष बर्वे,ग्रा.सदस्य बाळासाहेब शिंदे, किशोर साठे, बाळासाहेब झावरे पाटील, बाळासाहेब झावरे,मारुती उगले,किसन नाना वाबळे, बबनराव तळेकर,लहानू झावरे,सुदाम शिर्के, सोपान राऊत,संतोष झावरे,हिरामण साठे,भास्कर झावरे, भाऊसाहेब साळुंके,रंगनाथ झावरे,पोपटराव हिंगडे, तुकाराम साठे,लहू बर्वे,सुदाम भालके,सचिन सैद,मधुकर बर्वे,दत्तात्रय बर्वे,अरविंद वाबळे,किरण बर्वे,सुदाम भालके,सुंदरबापू झावरे,साहेबराब हिंगडे,बाळासाहेब शिंदे,दत्ता गांगड,संग्राम झावरे,बापू गायखे,देवराम बर्वे,सोपान झावरे,निकिल दाते,अनिकेत बर्वे,स्वप्नील झावरे तसेच गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थितीत होते,तिच्या या यशाबद्दल परिसरातून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे.


 सर्वांची मोलाची साथ लाभली - तृप्ती बर्वे 
या वाटचालीत शैक्षणिक वारसा हा आजोबा सीताराम बर्वे गुरुजी कडून मिळाला,वडिल सुभाष बर्वे गुरुजी नेहमीच मनोधैर्य प्रबळ केलं,तर चुलते मधुकर बर्वे सर (अण्णां)यांनी जिदी ने लढण्यासाठी बळ दिलं, कुटुंबातील प्रत्येक जण या यशाचे भागीदार आणि साक्षीदार आहेत.माझ्या सर्व शिक्षकांनी मला उत्तम आणि मोलाचं मार्गदर्शन केले.आज आपण सर्वांनी मला माझ्या यशासाठी शुभेछा व पुढील वाचालीसाठी आशिर्वाद दिलेत त्यासाठी मी व माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने मी आपल्या सर्वांची आभारी व कृषी राहील अशी प्रतिक्रिया तृप्ती बर्वे हीने दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या