Ticker

6/Breaking/ticker-posts

सनसनाटी: 'ईडी'च्या चौकशा लावण्यामागे फडणवीसांचा हात !

 





लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर: ‘महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात भूमिका असणाऱ्या आणि भाजपला अडचणीच्या ठरू शकणाऱ्यांविरुद्ध ईडीच्या चौकशा लावल्या जात आहेत. हे प्रकार सातत्याने सुरू असून यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच आहेत,’ असा सनसनाटी आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांनी केला.

 ईडी, सीबीआयला अटकाव करण्यासाठी राज्य लवकरच एक कायदा करणार अस ल्याचेही मुश्रीफ यांनी  सांगीत ले. मुश्रीफ काल नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीत भाजप अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण करीत आहेत. देशात सर्वत्र भाजपच्या विरोधातील आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही राजकारण खेळले जात आहे अस ते म्हणाले

 
येथेही भाजपच्या विरोधातील लोकांच्यामागे ईडीची चौकशी लावली जात आहे. आमची आता खात्री झाली आहे की, हे सर्व फडणवीस हेच करीत आहेत. राज्यात वाढत असलेल्या या प्रकारांकडे राज्य सरकार आता गंभीर्याने पहात असून यासंबंधी लवकरच कायदा केला जाणार आहे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या