प्राचार्य बी. के. लगड यांच्या सेवापुर्ती बद्दल आमदार डॉ तांबे कडून गौरव
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीगोंदा:- विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना अनुदान मिळण्याकरिता शैक्षणिक
वापरासाठी करण्यात येणार्या शाळांच्या बांधकामाचा प्रश्न व दंडात्मक कारवाई बाबत
शासन दरबारी निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू, तसेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित तत्वावर नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर
आलेल्या सर्व सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे
आमदार तांबे यांनी सांगितले.
वांगदरी तालुका
श्रीगोंदा येथील श्री शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालय येथील प्राचार्य बी के लगड हे प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.. त्यानिमित्त या छोटेखानी
सत्कार सोहळ्यास आमदार डॉ सुधीर तांबे हे आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी
सेवानिवृत्त प्राचार्य बी के लगड यांचा आमदार तांबे यांनी सपत्निक सत्कार केला.
यावेळी प्राचार्य लगड यांच्या कार्याचा गुणगौरवपर भाषणात आमदार
तांबे पुढे म्हणाले की ,एकाच
विद्यालयात 33 वर्षे सेवा करून श्री लगड यांनी ग्रामीण
विकास शिक्षण संस्थेच्या विस्तार व विकासामध्ये मोलाचे योगदान दिले. ग्रामीण भागात
गोरगरिबांच्या मुला-मुलींसाठी माध्यमिक शिक्षणाची सोय असावी, असा संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांच्या
स्वप्नपूर्तीस श्री लगड यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. श्रीगोंदा तालुक्यात
शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न प्राचार्य लगड यांनी केला. एवढ्यावरच प्राचार्य थांबले नाहीत ,तर त्यांनी सेवा कालखंडामध्ये संस्था अंतर्गत शिक्षकांसाठी शैक्षणिक
दृष्ट्या योग्य अशी मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित करून
संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या
कामाचा एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तसेच आता स्वर्गीय बापूंचे
अधुरे राहिलेले स्वप्न संस्थेचे सचिव राजेंद्र नागवडे हे पूर्ण करतील.
अशी मला खात्री आहे. असे सांगून प्राचार्य लगड यांना आमदार तांबे
यांनी पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.
सत्काराला
उत्तर देताना प्राचार्य लगड यावेळी म्हणाले की, ग्रामीण
भागात एकाच विद्यालयात 33 वर्षे मुख्याध्यापक म्हणून जी सेवा
केली. व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी
कसे प्रयत्न केले. याबाबत श्री लगड यांनी विस्तृत माहिती यावेळी
दिली. स्वर्गीबापूं बाबत बोलताना ते म्हणाले की, या सेवापूर्ती
समारंभास आदरणीय बापू हवे होते. भावनाविवश होऊन स्वर्गीय बापू प्रती कृतज्ञता
व्यक्त केली या पुढील आयुष्यात ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेसाठी कार्यरत
राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी
काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव वाफारे संगमनेरचे नगरसेवक मिलिंद
औटी,प्रशांत दरेकर श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिनराव लगड, वांगदरी गावचे
सरपंच आदेश नागवडे ,उपसरपंच शिवाजीराव चोरमले, महेश नागवडे, दगडू सोनवलकर ,शिक्षक
नेते रमजान हवालदार, संदीप नागवडे ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतील सर्व
मुख्याध्यापक व सेवक वृंद यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन श्री आप्पासाहेब जगताप व सतीश जामदार यांनी
केले आभार सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बापूराव भिसे यांनी मानले.
0 टिप्पण्या