Ticker

6/Breaking/ticker-posts

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के

 लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर: - महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी दै.नगर सह्याद्री तथा न्यूज २४ सह्याद्री चे संपादक ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ राजकीय विश्लेषक तथा प्रसिद्ध पत्रकार राजा माने यांनी या नियुक्तीचे पत्र नुकतेच श्री. शिर्के यांना प्रदान केले.


डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना राज्य स्तरावर नोंदणीकृत असून डिजिटल मीडिया मध्ये काम करणार्‍या पत्रकारांना शासकीय सेवा सवलती मिळाव्यात व त्यांना पत्रकारितेचा अधिकृत दर्जा मिळावा यासाठी  राज्य स्तरावर कार्य करणार आहे. प्रदेशाध्यक्ष माने यांनी नुकतेच संघटनेचे राज्याचे विभागीय अध्यक्ष जाहीर केले. श्री. शिर्के यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. नगरसह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार याच पाच जिल्ह्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारीणी लवकरच प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या सल्ल्याने जाहीर केली जाईल असे शिवाजी शिर्के यांनी सांगितले.


शिवाजी शिर्के हे गेली २७ वर्षांपासून नगरमध्ये पत्रकारीतेत कार्यरत आहेत. लोकमत, देशदूत मध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर ते सध्या नगर सह्याद्रीया दैनिकाचे मालक- संपादक म्हणून गेली आठ वर्षांपासून कार्यरत आहेत. न्यूज २४ सह्याद्री ही वृत्तवाहीनी एक वर्षांपासून ते चालवत आहेत. या वृत्तवाहिनीने अल्पावधीत राज्यात वेगळा ठसा उमटवला आहे. शोध पत्रकारीता हा शिर्के यांचा आवडता विषय. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी राज्यपातळीवर चर्चा आणि निर्णय होणारे अनेक विषय हाताळले. त्यांच्या या लिखाणाची दखल घेत त्यांना आतापर्यंत राज्यस्तरावरचे सोळा आणि जिल्हास्तरावरील ४८ पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनानेही त्यांच्या लिखाणाची दखल घेत त्यांचा गौरव केला आहे.


अहमदनगर प्रेस क्लबचे ते सध्या अध्यक्ष आहेत. पत्रकारांचे विविध विषय आणि प्रश्‍न याची त्यांना जाणिव आहे. नगर जिल्ह्यातील पत्रकारांच्या मदतीला धावून जाणारा, सुखदु:खात सहभागी होणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी टाकलेल्या विश्‍वासाबद्दल समाधान व्यक्त करतानाच ही संघटना राज्यात पत्रकारांसाठी निश्‍चितपणे चांगले काम करील असा विश्‍वास शिवाजी शिर्के यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या